Akshay Sabale
मोदी सरकारच्या कार्यकाळात कोट्यवधींची घोषणा करणारे मंत्री म्हणून नितीन गडकरी यांना ओळखलं जातं.
देशातील मोठ्या महामार्गांच्या निर्मितीमुळे 'रोडकरी' म्हणूनही गडकरींची ओळख आहे. मात्र, मोठ मोठे महामार्ग उभारणाऱ्या नितीन गडकरी यांची संपत्ती किती? असा प्रश्न सर्वांना पडतो.
नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना नितीन गडकरी यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली आहे.
निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, गडकरींकडे ( Nitin Gadkari ) 1 कोटी 32 लाख 90 हजार रुपयांची चल संपत्ती आहे.
4 कोटी 95 लाख रुपयांची अचल संपत्तीही गडकरींकडं आहे. त्यांच्यावर 1कोटी 66 लाख 82 हजार रुपयांचं कर्ज आहे.
31 लाख 88 हजार रुपयांचे दागिनेही गडकरींकडे आहेत. 29 लाख 40 हजार रुपये किमतीची अॅम्बेसिडर आणि होंडाची कारही गडकरींच्या पार्किंगमध्ये आहे.
R
NEXT : धानोरकरांकडे 'एवढी' संपत्ती; तर 50 कोटींचं कर्जही