Mukesh Dalal : ना मतदान, ना मतमोजणी...थेट खासदार; मुकेश दलाल बनणार भाजपच्या गळ्यातील ताईत...

Rajanand More

भाजपचे 400 पारचे लक्ष्य

भाजपने लोकसभा निवडणुकीत 400 पारचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी गुजरातमधील सर्व 26 जागा जिंकण्याची तयारी भाजपने केली आहे.

PM Narendra Modi | Sarkarnama

भाजपचा पहिला विजय

सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले आहेत. देशातील ते भाजपचे पहिले खासदार ठरले आहेत.

Mukesh Dalal | Sarkarnama

कसा झाला विजय?

काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडून सोमवारी बाद करण्यात आला.

Nilesh Kumbhani | Sarkarnama

कोर्टात धाव

अर्ज बाद केल्यानंतर कुंभाणी यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. अद्याप त्यावर सुनावणी झालेली नाही.

Nilesh Kumbhani | Sarkarnama

बसपा, अपक्षांचीही माघार

बसपा आणि इतर अपक्षांसह सर्व आठ उमेदवारांनीही निवडणुकीतून माघार घेतल्याने दलाल बिनविरोध विजयी झाले.

Mukesh Dalal | Sarkarnama

43 वर्षांपासून भाजपसोबत

मुकेश दलाल हे भाजपमध्ये 1981 पासून कार्यरत आहेत. मात्र, पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीत उतरले.

Mukesh Dalal | Sarkarnama

पाटलांशी जवळीक

गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख. सध्या सुरत भाजपचे महासचिव.

Mukesh Dalal, Chandrakant Patil | Sarkarnama

महत्त्वाची पदे

सुरत महापालिकेच्या स्थायी समितीचे पाच वेळा अध्यक्ष म्हणून काम. महापालिकेत तीनदा नगरसेवक.

Mukesh Dalal | Sarkarnama

भाजपच्या गळ्यातील ताईत

बिनविरोध विजय मिळाल्याने मुकेश दलाल भाजपच्या गळ्यातील ताईत बनणार आहेत. त्यांच्या विजयाचा डंका देशभर पिटला जाईल.

R

Mukesh Dalal | Sarkarnama

NEXT : मोदींच्या नावानं अपक्ष उमेदवार मागताहेत मत; कोण आहेत आचार्य दीप?