Narendra Modi News : काँग्रेसनं पराभव मान्य केला ते विरोधकांनी हार मानू नये; मोदींच्या भाषणातील 8 मुद्दे

Akshay Sabale

मोदींची नांदेडमध्ये सभा -

नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर आणि हिंगोलीतील शिवसेनेचे ( शिंदे गट उमेदवारी ) बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली.

narendra modi | sarkarnama

'इंडिया' आघाडीवर टीका -

या सभेतून पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर हल्लाबोल केला. 'इंडिया' आघाडीवरही पंतप्रधान मोदी बरसले. पंतप्रधानांच्या सभेतील काही मुद्दे जाणून घेऊया...

narendra modi | sarkarnama

लोकशाहीसाठी मतदान -

देशासाठी सीमेवर ज्या पद्धतीने जवान कशाचीही तमा न बाळगता तैनात असतो. तसंच देशाच्या लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे.

narendra modi | sarkarnama

मतदान न करणं योग्य नाही -

तुम्ही 'एनडीए'च्या बाजूने एकतर्फा मतदान करून आपला विजय निश्चित करत आहात, त्याबद्दल आभार. पण, जे लोक मतदान करत नाहीत, ते योग्य नाही.

Narendra Modi | Sarkarnama

विरोधकांनी हिंमत हारू नये -

विरोधकांनी निराश होऊ नये, आज नाही तर उद्या, कधी ना कधी तुम्हाला संधी मिळेलच. हिंमत हारू नका. भारताच्या मतदानाचा जगावर प्रभाव होतो.

Narendra Modi | Sarkarnama

भ्रष्टाचार लपवतेय -

आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी 'इंडिया' आघाडीचे नेते काम करत आहेत. देश कोणाच्या हातात सोपवायचा हेच ते ठरवू शकलेले नाहीत.

Narendra Modi | Sarkarnama

काँग्रेसला उमेदवार मिळेनात -

लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसने पराभव मान्य केला आहे. त्यांच्यात लढण्याची हिंमत नाही, त्यांना उमेदवार मिळत नाही.

Narendra Modi | sarkarnama

गरिबांची काँग्रेसकडून थट्टा -

4 जूननंतर 'इंडिया' आघाडी शतप्रतिशत एकमेकांचे कपडे फाडून, केस ओढतील. त्यांच्यावर मत वाया घालवू नका. आम्ही गरिबांसाठी काम केले तर त्याची थट्टा काँग्रेसकडून केली जाते.

narendra modi | sarkarnama

तरुण नोकरीसाठी बाहेर -

काँग्रेसमुळे मराठवाड्याचा विकास रखडला, तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावे लागतं आहे.

narendra modi | sarkarnama

सनातन धर्माला शिव्या -

राम मंदिर उभे राहिले, पण 'इंडिया' आघाडीचे लोक सनातन धर्माला शिव्या देत आहेत, राम मंदिर, आमच्या भावनांचा अपमान करत आहेत.

R

Narendra Modi | sarkarnama

NEXT : आमदारकीनंतर धंगेकरांच्या संपत्तीत घट

ravindra dhangekar | sarkarnama