Ravindra Dhangekar Net Worth : आमदारकीनंतर धंगेकरांच्या संपत्तीत घट

Akshay Sabale

धंगेकर कोट्यधीश -

पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे कोट्यधीश आहेत. धंगेकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा यांच्याकडे एकूण 8 कोटी 16 लाख रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे.

ravindra dhangekar | sarkarnama

शपथपत्र -

तर धंगेकरंच्या नावावर 35 लाख 73 हजार रुपयांचे कर्ज, तर पत्नीच्या नावावर 32 लाख 42 हजार रुपयांचे कर्ज असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे.

ravindra dhangekar | sarkarnama

पोटनिवडणुकीत संपत्ती -

एक वर्षापूर्वी झालेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत धंगेकर आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण 8 कोटी 36 लाख 10 हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता होती.

ravindra dhangekar | sarkarnama

पोटनिवडणुकीवेळी कर्ज -

धंगेकर यांच्या नावावर 35 लाख 73 हजार रुपयांचे, तर पत्नीच्या नावावर 32 लाख 8 हजार रुपयांचे कर्ज होते.

ravindra dhangekar | sarkarnama

स्थावर अन् जंगम मालमत्ता -

लोकसभा निवडणुकीसाठी धंगेकरांनी गुरुवारी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावरून त्यांच्याकडे एकूण 4 कोटी 82 लाख 90 हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे.

ravindra dhangekar | sarkarnama

पत्नीकडे 8 कोटींची मालमत्ता -

पत्नीच्या नावे एकूण 3 कोटी 33 लाख 11 हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. धंगेकर आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण 8 कोटी 16 लाख रुपयांची मालमत्ता आहे.

ravindra dhangekar | sarkarnama

ravindra dhangekarसंपत्तीत घट -

एक वर्षात धंगेकर यांच्या एकूण मालमत्तेत 20 लाख रुपयांनी घट झाल्याचे दिसते. मात्र धंगेकर यांच्या नावावरील कर्जाची रक्कम तेवढीच आहे.

ravindra dhangekar | sarkarnama

सोने-चांदीचा व्यवसाय -

धंगेकरांची मागील आर्थिक वर्षात (2023-24) 8 लाख 7 हजार रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचे नमूद केले आहे. शेती व सोने-चांदी कारागिरी असा त्यांचा व्यवसाय असल्याचे नमूद आहे.

ravindra dhangekar | sarkarnama

NEXT : तटकरेंविरोधात मैदानात उतरलेल्या ठाकरेंच्या शिलेदाराची संपत्ती तुम्हाला माहितेय का?

anant geete | sarkarnama