सरकारनामा ब्यूरो
राजाभाऊ वाजे हे नाशिकच्या सिन्नर जिल्ह्यातील एक लोकप्रिय राजकारणी आहेत
शिवसेना नेते राजाभाऊ हे सिन्नर विधानसभा मतदारसंघातून 13 व्या महाराष्ट्र विधानसभेचे आमदार होते.
त्यांची राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. त्यांच्या कुटुंबातील आजोबा, आजी यांनीही सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.
आजोबा शंकर बालाजी वाजे हे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर सिन्नरचे पहिले विधानसभा सदस्य तर आजी रुक्मिणीबाई या 1967 मध्ये याच मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार होत्या.
वडील प्रकाश वाजे यांनीदेखील सिन्नर विधानसभा मतदारसंघातून 2009 ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली होती.
शेतकरी बांधवांना सदैव पाठिंबा देणारे राजाभाऊ यांनी अनेक कृषी आणि शेतकरी आंदोलनांचे नेतृत्व केले आहे.
ते 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर पहिल्यांदा निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
राजाभाऊ वाजे हे आत्तापर्यंत कुठल्याही वादाच्या पेचात अडकले नाहीत.
साधी राहणी अन् उच्च विचार बाळगणारे राजाभाऊ हे वाणिज्य शाखेतून पदवीधर आहेत.