Sachin Waghmare
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यासाठी काही तासांचा कालावधी शिल्लक असताना एक मोठा सर्व्हे समोर येत आहे.
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या ओपिनियन पोलनुसार राज्यात महायुतीला सर्वाधिक 28 जागा जागा मिळतील.
भाजपला 22 जागा तर एकनाथ शिंदे अजित पवार यांना मिळून 6 मिळतील असा अंदाज आहे.
काँग्रेसला 4 तर ठाकरे आणि शरद पवार यांना मिळून 16 जागा अशा एकूण 20 मिळतील असा अंदाज आहे.
2019च्या निवडणुकीत भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या. पोलनुसार यावेळी त्यांची एक जागा कमी होताना दिसते.
काँग्रेसला गेल्या निवडणुकीत 1 जागा मिळाली होती यावेळी त्यात वाढ होत खासदारांची संख्या 4 वर जाण्याची शक्यता.
महायुतीला 50.88 टक्के मते 2019 मध्ये मिळाली होती. 2024 मध्ये त्यात घट होऊन 42.7 इतकी होण्याची शक्यता.
राज्यात गेल्या वेळी एमआयएमला एक जागा मिळाली होती. यावेळी मात्र जागा देखील त्यांना गमवावी लागू शकते.
युपीएला 2019 मध्ये 32.24 टक्के मते मिळाली होती. यावेळी वाढ होऊन 42.9 इतकी होण्याची शक्यता .