Lok Sabha Election 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकांची अशी आहेत वैशिष्ट्ये...

सरकारनामा ब्यूरो

मतदान केंद्रे अन् कर्मचारी

निवडणुकांसाठी 10.5 लाख मतदान केंद्रे तयार असून, 1.5 कोटी कर्मचारी यासाठी कार्यरत असणार आहेत.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

18 वी लोकसभा 

आतापर्यंत देशात 17 लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता 18 व्या लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

सात टप्प्यांत मतदान -

यंदाची लोकसभा निवडणूक देशभरात सात टप्प्यांत होणार आहे.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान -

शांततेत निकोप निवडणुका पार पाडण्यासाठी देशात सात, तर महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांत ही मतदान प्रक्रिया पार पडेल.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

राज्याचा पहिला टप्पा

राज्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या ठिकाणी 19 एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान होईल.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

दुसरा टप्पा

26 एप्रिलला बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याचे मतदान होईल.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

तिसरा टप्पा

रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या ठिकाणी 7 मे ला मतदान होईल.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

चौथा टप्पा

13 मे ला नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीडला मतदान पार पडेल.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

पाचवा टप्पा

पाचवा आणि शेवटच्या टप्प्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांत मतदान पार पडेल.

R

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

Next : हवालदार ते खासदार अन् गुजरात भाजपची 'पाटीलकी'; पाहा फोटो!

येथे क्लिक करा