Rajanand More
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्या तीन टप्प्यांत म्हणजे 31 मार्च ते पाच मे या कालावधीत सर्वच नेत्यांचा प्रचाराचा धडाका सुरू होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये तब्बल 83 सभा घेतल्या. पहिल्या टप्प्यात 19 आणि दुसऱ्या टप्प्यात 16 सभा झाल्या.
पंतप्रधान मोदींनी तिसऱ्या टप्प्यात सभांचा वेग भलताच वाढवला. त्यांनी तब्बल 36 सभा घेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला. तिन्ही टप्प्यांत महाराष्ट्रात सर्वाधिक 12 सभा झाल्या.
पंतप्रधान मोदींना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची साथ मिळाली. त्यांनीही 66 सभा घेत प्रचाराचा धुरळा उडवला. दुसऱ्या टप्प्यांत मोदींपेक्षा जास्त सभा घेतल्या.
अमित शाहांचा सध्या दररोज दोन ते तीन सभांचा धडाका सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ते केवळ सरासरी एक सभा घेत होते.
काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदींच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी म्हणजे केवळ सभा घेतल्या आहेत. सर्वाधिक 58 टक्के सभा दक्षिणेकडील राज्यांमध्ये झाल्या. एकट्या केरळात 13 सभा.
73 वर्षीय मोदींकडून प्रचाराचा धडाका सुरू असताना 53 वर्षीय राहुल यांच्या दिवसभरात एक किंवा दोनच सभा होत आहेत. मित्रपक्षांकडून कमी मागणी.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी प्रचारात सक्रीय असल्या तरी तुलनेने त्यांच्या खूप कमी सभा झाल्या आहेत. पहिल्या तीन टप्प्यांत केवळ 29 सभा.
प्रियांका यांच्या सर्वाधिक 33 टक्के सभा केरळात झाल्या आहेत. इतर मतदारसंघात त्यांच्या सभांसाठी फारशी मागणी नसल्याने दोन दिवसांतून एखादी सभा त्यांनी घेतल्याचे दिसते.