Akshay Sabale
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांकडून '400 पार'चा नारा दिला जात आहे. या नाऱ्याची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हवाच काढली आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लोकसभेची निवडणूक लोकांनीच हातात घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा त्यांच्याच अंगलट आल्या आहेत.
एकूणच भाजपला सध्या बहुमताचा 272 चा आकडाही गाठणं अवघड आहे. केंद्रात सत्ताबदलाची शक्यता स्पष्टपणे दिसते आहे.
देशात एकूणच भाजपच्या विरोधात वातावरण आहे. महाराष्ट्रातही चित्र वेगळं नाही.
राज्यातील 32 ते 35 जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील.
अजित पवार गटाची एकही जागा निवडून येणार नाही. शिंदे गटाच्या तीन ते चार जागा निवडून येऊ शकतात.
भाजपला साधं बहुमत मिळणंही अवघड आहे. काँग्रेसचे 12 उमेदवार निवडून येण्याचा अंदाज आहे.
केंद्रात सत्ताबदल होणार, असं चित्र आहे. इंडिया आघाडीला 240 ते 260 पर्यंत जागा मिळतील. भाजपला फार कमी जागा मिळतील.
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या जागा वाढतील, असे एकही राज्य दिसत नाही. या वेळी भाजपला 272 जागाही मिळणार नाहीत, असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.