Uddhav Thackeray News : गझनी सरकार, भेकड लोक, निवडणूक आयोग नोकर अन्...; ठाकरेंच्या मुलाखतीतील मुद्दे वाचा

Akshay Sabale

स्वातंत्र्य टिकवण्यासाठी लढा -

लोकशाही वाचविण्यासाठी हे महाभारत सुरू आहे. स्वातंत्र्य टिकवण्यासाठी हा लढा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

Uddhav Thackeray | sarkarnama

द्रौपदीचं वस्त्रहरण -

आताची निवडणूक ही महाभारतासारखी चालली आहे. हे खरंच आहे. त्यावेळच्या महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं.

Uddhav Thackeray | sarkarnama

लोकशाही वाचवण्यासाठी लढाई -

आपल्या देशातील लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय. म्हणून ही लोकशाही वाचवण्यासाठीची लढाई आहे.

Uddhav Thackeray | sarkarnama

'नकली शिवसेना' -

पंतप्रधान आपल्या शिवसेनेला, म्हणजे माझ्या शिवसेनेला, जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली, जिचं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं, तिला ‘नकली शिवसेना’ म्हणतायत.

Uddhav Thackeray | sarkarnama

निवडणूक आयोग नोकर -

याचा अर्थ उघड आहे… निवडणूक आयोग हा त्यांचा नोकर आहे. लवादानेसुद्धा ते म्हणतील तसंच काम केलेलं आहे

Uddhav Thackeray | sarkarnama

पंतप्रधानांचा न्यायालयावर दबाव? -

आता सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा आम्हाला हे चिन्ह किंवा नाव देऊ नये, असा अप्रत्यक्ष दबाव हे आपले प्रधानमंत्री सर्वोच्च न्यायालयावरती आणतायत की काय, असा प्रश्न पडलेला आहे.

Uddhav Thackeray | sarkarnama

भेकड लोक -

अभिमन्यू हा शूर होता. तो भेकड नव्हता. आज हे जे काय ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या माध्यमांतून चक्रव्यूह टाकतायत हे भेकड लोक आहेत. यांना अभिमन्यूसारखं धैर्य नाहीये लढायचं.

Uddhav Thackeray | sarkarnama

गझनी सरकार -

मोदी सरकारच्या थापा या उघड झालेल्या आहेत. आता मी भाषणातील मुद्दे काही इकडे मांडत नाही; पण मी या सरकारला गझनी सरकार म्हणतो.

Uddhav Thackeray | sarkarnama

त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशिं' -

त्यांची शिवसेना म्हणजे, ‘एसंशिं…’ म्हणजे त्यांचे जे पूर्ण नाव आहे, ते मी घेऊ पण इच्छित नाही. जसं माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते. म्हणून ते शॉर्टफॉर्म करतात.

Uddhav Thackeray | sarkarnama

NEXT : नरेंद्र दाभोलकर हत्या ते निकाल, 11 वर्षांत काय घडलं? वाचा सविस्तर...

narendra dabholkar | sarkarnama