Akshay Sabale
भाजपनं पहिल्या यादीत 195 लोकसभा उमेदवारांची घोषणा केली आहे, तर काँग्रेसमध्ये सध्या छाननी समितीत उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
काँग्रेसच्या समितीनं चार राज्यांतील वरिष्ठ नेत्यांना रिंगणात उतरवण्याची सूचना केली आहे. त्यात छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीतील नेत्यांच्या नावांवर चर्चा झाली आहे.
राजस्थानमधून सचिन पायलट, प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे चिरंजीव वैभव गेहलोत, बिजेंद्र ओला, भंवर जितेंद्र सिंह, सी.पी. जोशी यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यानंतर प्रियांका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यांचा निवडणूक लढण्याचा परिणाम इतर जागांवर होऊ शकतो.
गेहलोत यांनी 1980 ते 1998 या काळात जोधपूरमधून लोकसभेच्या सहापैकी पाच निवडणुका जिंकल्या आहेत. जोधपूरमधून गेहलोत उमेदवार झाल्यास जालोर, पाली, बाडमेर येथे फायदा होईल.
भूपेश बघेल यांनी लोकसभा निवडणूक कधीच लढवली नाही. या वेळी राजनांदगावमधून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.
सचिन पायलट छत्तीसगडचे प्रभारी आहेत. जनतेचा पाठिंबा पाहता त्यांना टोंक-सवाई माधोपूरमधून उमेदवारी दिली जाऊ शकते.
बी. श्रीनिवास यांनी मोदी सरकारच्या विरोधात अनेक निदर्शन केली आहेत. त्यांना बंगळुरूमधून उमेदवारी देत तरुणांना संदेश दिला जाऊ शकतो.
R