Lok Sabha Election 2024 : तटकरेंविरोधात मैदानात उतरलेल्या ठाकरेंच्या शिलेदाराची संपत्ती तुम्हाला माहितेय का?

Akshay Sabale

उमेदवारी अर्ज दाखल -

रायगडमध्ये शिवसेनेचे ( ठाकरे गट ) उमेदवार विरुद्ध राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यात सामना रंगणार आहे. सोमवारी गीतेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

anant geete | sarkarnama

शपथपत्रात संपत्तीची माहिती -

गीतेंनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात, 8 कोटी 19 लाख 59 हजार 798 रुपयांची संपत्ती असल्याचं जाहीर केलं.

anant geete | sarkarnama

संपत्तीत वाढ -

2019 च्या तुलनेत गीतेंच्या संपत्तीत 1 कोटी 49 लाख 420 रुपयांची वाढ झाली आहे.

anant geete | sarkarnarma

कर्ज -

गीतेंवर 2 कोटी 13 लाख 41 हजार 268 रुपये इतके कर्ज आहे. त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही.

2019 मधील संपत्ती -

2019 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना गीतेंनी शपथपत्रात सात कोटी 19 लाख 10 हजार 378 रुपये संपत्ती असल्याचं जाहीर केलं होतं.

2014 मधील संपत्ती -

2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी गीतेंनी जाहीर केलेली एकूण संपत्ती चार कोटी 44 लाख 66 हजार 487 रुपये होती.

जंगम अन् स्थावर मालमत्ता -

गीतेंची 2 कोटी 34 लाख 20 हजार 852 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, तर 5 कोटी 73 लाख 49 हजार 798 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

R

NEXT : पहिल्या टप्प्यात 'एवढे' उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; महाराष्ट्रातील किती?

representative photo | sarkarnama
क्लिक करा...