Rahul Gandhi In Gujrat : संविधान, अदानी अन् अंबानी; राहुल गांधी मोदींच्या बालेकिल्ल्यात काय म्हणाले?

Akshay Sabale

चंदनजी ठाकोर यांच्यासाठी सभा -

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी गुजरातमधील पाटण येथे काँग्रेस उमेदवार चंदनजी ठाकोर यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित केले.

rahul gandhi | sarkarnama

भाजपवर टीका -

या वेळी राहुल गांधी म्हणाले, भाजप नेते उघडपणे बोलत आहेत की, आम्ही निवडणूक जिंकलो तर संविधान बदलू.

rahul gandhi | sarkarnama

संविधान संरक्षण करते -

हे संविधान गरीब, शेतकरी आणि दुर्बल घटकांच्या हक्कांचे संरक्षण करते.

rahul gandhi | sarkarnama

सर्व अधिकार संविधानामुळं -

काँग्रेस आणि आघाडी राज्यघटनेचे रक्षण करत आहेत आणि ते टिकवण्यासाठी लढत आहेत. कारण, आज जे काही अधिकार मिळाले आहेत, ते या संविधानामुळे मिळाले आहेत.

rahul gandhi | sarkarnama

आरक्षण बंद करण्याचा प्रयत्न -

नरेंद्र मोदी आणि भाजपचे लोक म्हणत आहेत की आरक्षण रद्द करू. फक्त आरक्षणच नाही तर जिथे जिथे दुर्बल लोकांना थोडाफार फायदा मिळतो. तिथे हे लोक ते बंद करण्याचा प्रयत्न करू लागतात.

rahul gandhi | sarkarnama

संपत्तीवर 20 ते 22 लोकांचं नियंत्रण -

मोदींना देशाच्या संपूर्ण संपत्तीवर केवळ 20 ते 22 लोकांचे नियंत्रण हवे आहे. संपूर्ण देशाची स्थिती काय आहे ते तुम्ही पाहू शकता.

rahul gandhi | sarkarnama

अदानी, अंबानी -

आज 70 कोटी भारतीयांइतकी संपत्ती असलेले 22 लोक आहेत. अदानी, अंबानी आणि इतरांची नावे तुम्हाला माहीत असतीलच. त्याची सुरुवात गुजरातमधूनच झाली.

rahul gandhi | sarkarnama

कर्ज माफ -

मोदींनी या 20 ते 22 लोकांचे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे, असा आरोपही राहुल गांधींनी केला आहे.

R

rahul gandhi | sarkarnama
mihir kotecha | sarkarnama
क्लिक करा...