Akshay Sabale
शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेत राज ठाकरे यांनी बेधडक भाषण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. त्यासह मोदींकडे काही मागण्या राज ठाकरेंनी केल्या.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही जुनी मागणी आहे ती पूर्ण व्हावी.
जवळपास 125 वर्ष या हिंदभूमीवर मराठा साम्राज्य होतं. त्याचा इतिहास देशातल्या प्रत्येक शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा.
शिवछत्रपतींची स्मारकं म्हणजे त्यांनी उभारलेले गडकिल्ले. या किल्ल्यांचं जतन करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष समिती नेमून लक्ष द्यावं.
संविधान बदलणार नाही हे मला माहीत आहेच. पण, मोदींनी पुन्हा एकदा देशाला आश्वस्त करावं की भारतीय संविधानाला धक्का लागणार नाही.
मुंबई रेल्वेच्या प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी म्हणून रेल्वेला भरपूर निधी द्यावा.
देशात तुम्ही जसे उत्तम रस्ते बनवलेत, पण गेली 20वर्ष रखडलेला आमचा मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करून घ्यावा.