Rajanand More
राजस्थानातील बाडमेर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार. याच जिल्ह्यातील शिव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान अपक्ष आमदार.
राजस्थानात युवा नेता म्हणून प्रचंड लोकप्रिय. त्यांचे रोड शो आणि सभांना होणारी गर्दी भाजपसह काँग्रेसला धडकी भरवत आहे. सोशल मीडियातही लाखो फॉलोअर्स.
बाडमेरमधील दुधोडा हे मूळ गाव. वडील शिक्षक. राजकारणाशी काहीच संबंध नव्हता. जय नारायण व्यास विद्यापीठात आल्यानंतर एबीव्हीपीमध्ये सहभागी.
2019 मध्ये एबीव्हीपीने उमेदवारी न दिलेल्या विद्यापीठात विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी होत इतिहास घडवला.
विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांसाठी गेहलोत सरकारच्या काळात विधानसभेला घेराव. अनेक मुद्द्यांवर सरकारविरोधात आवाज उठवल्याने युवकांच्या गळ्यातील ताईत बनले.
युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाल्यानंतर 2022 मध्ये भाजपमध्ये प्रवेश. शिव विधानसभा मतदारसंघातून तितिटाची मागणी. भाजपने उमेदवारी नाकारली.
भाजपमध्ये बंडखोरी करत निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरले आणि जिंकलेही. भाजप उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले होते.
चार एप्रिलला लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल. युवकांची प्रचंड गर्दी झाल्याने विरोधकांना धडकी भरली. सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल.
केवळ राजस्थानच नव्हे तर महाराष्ट्र, बंगळुरू, हैदराबादसह आणखी काही शहरांमध्ये घेतलेल्या राजस्थानी लोकांच्या बैठकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.
R