Rashmi Mane
राज्यातील काँग्रेससाठी आशादायक चेहरा, कोल्हापूरच्या राजकारणातील किंग मेकर सतेज पाटील यांचा आज वाढदिवस.
कोल्हापूरकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अविरत झटणारे लाडके नेते बंटी पाटील म्हणजेच सतेज पाटील.
लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षाचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत आहेत.
जिल्हा बँकेचे संचालक, कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सक्रिय राजकारणात भाग घेतला आहे.
मोदी लाटेतही राज्यात भाजप-युतीचं सरकार असतानाही मंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता स्थापन केली होती.
सुप्रसिद्ध शिक्षण महर्षी डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव असणारे सतेज पाटील कॉलेजच्या जीवनापासून राजकारणात सक्रिय होते.
NSUI च्या माध्यमातून त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या स्टुडंट कौन्सिलची पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती.
कोल्हापुरातून 4 आमदार निवडून आणण्यात सतेज पाटलांचा सिंहाचा वाटा आहे. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील आपला करिश्मा दाखवणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
R