Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी, हेमा मालिनी..; ‘या’ आहेत दुसऱ्या टप्प्यातील ‘हायप्रोफाइल’ लढती

Rajanand More

राहुल गांधी

केरळातील वायनाड मतदारसंघात काँग्रेस नेते राहुल गांधी, सीपीएमच्या अनी राजा आणि भाजपचे के. सुरेंद्रन यांच्यात लढत होत आहे. राहुल विद्यमान खासदार आहेत.

Rahul Gandhi | Sarkarnama

हेमा मालिनी

उत्तर प्रदेशातील मथुरा लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा मैदानात. त्यांच्याविरोधात काँग्रेसने मुकेश धंगर यांना उतरवले आहे. 

Hema Malini | Sarkarnama

शशी थरुर

तिरुवअनंतपुरम मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान खासदार शशी थरुर आणि केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यात लक्षवेधी लढत.

Shashi Tharoor | Sarkarnama

एचडी कुमारस्वामी

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री मांड्या मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने वेंकटरमन गौडा यांना उतरवले आहे.

HD Kumaraswamy | Sarkarnama

गजेंद्र सिंह शेखावत

केंद्रीय मंत्री शेखावत जोधपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत. काँग्रेसचे करण सिंह उचीयाद्रा त्यांच्याविरोधात आहेत.

Gajendra Singh Shekhawat | Sarkarnama

भूपेश बघेल

सत्ता गेल्यानंतर छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री लोकसभेच्या रिंगणात. राजनंदगाव मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार संतोष पांडे यांच्याविरोधात काँग्रेसची उमेदवारी.

Bhupesh Baghel | Sarkarnama

प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अकोला मतदारसंघातून लढत आहेत. काँग्रेसने अभय पाटील यांना तर भाजपने अनुप धोत्रे यांना उतरवले आहे.

Prakash Ambedkar | Sarkarnama

तेजस्वी सूर्या

भाजपचा तरुण चेहरा आणि विद्यमान खासदार बंगळुरू दक्षिण मतदारसंघातून पुन्हा नशीब आजमावत आहे. काँग्रेसकडून सौम्या रेड्डी मैदानात.

Tejasvi Surya | Sarkarnama

नवनीत राणा

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार या वेळी भाजपच्या तिकिटावर लढत आहेत. बळवंत वानखडे हे काँग्रेसचे उमेदवार.

Navneet Rana | Sarkarnama

ओम बिर्ला

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला कोटा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांना मैदानात. गुज्जर समाजातील काँग्रेसचे उमेदवार प्रल्हाद गुंजाळ यांचे कडवे आव्हान.

R

Om Birla | Sarkarnama

NEXT : दानवेंना टक्कर देणाऱ्या कल्याण काळेंची संपत्ती किती?

येथे क्लिक करा.