Sunil Balasaheb Dhumal
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार पक्षाकडून भास्कर भगरे लढणार आहेत.
दिंडोरीत महायुतीकडून भाजपने केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना पुन्हा संधी दिली आहे.
आता दिंडोरीत राज्यमंत्री भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे अशी लढत पाहायला मिळणार आहे.
भास्कर भगरे हे शरद पवारांच्या विश्वासातील सक्रिय कार्यकर्ते आहेत.
व्यावसायाने शिक्षक असलेल्या भगरेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलन केली आहेत.
भास्कर भगरे हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत.
विविध राजकीय पदांचा अनुभव आणि शेतकऱ्यांप्रति कळवळा असलेला चेहरा पवारांनी भगरेंच्या रुपाने दिंडोरीत उतरवला आहे.