Akshay Sabale
काँग्रेसचे नेते आणि विद्यमान खासदार शशी थरूर यांनी केरळच्या तिरुवनंतपुरम या मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी संपत्तीविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार, 10 वर्षांच्या कार्यकाळात थरूर यांच्या संपत्तीत 20 कोटींची वाढ झाली आहे.
2014 मध्ये थरूरांची संपत्ती 23 कोटी होती. तर, 2019 मध्ये ती 35 कोटी झाली. 2024 मध्ये 20 कोटींची वाढ होत, आता थरूरांची संपत्ती 55 कोटी झाली आहे.
थरूरांकडे 49 कोटी रूपयांपेक्षा अधिक जंगम तर, 6.75 कोटी रूपयांपेक्षा अधिक किमतीची स्थावर मालमत्ता आहे.
6.20 कोटींची 10.47 एकर शेतजमीन आणि 543 ग्रॅम सोने तसेच 36 हजार रोख रक्कम थरूरांकडे आहे.
तिरुवनंतपुरम येथे 52 लाखांचं निवासस्थान थरूरांचं आहे. तसेच, 16.49 लाख रूपयांचं कर्जही त्यांच्यावर आहे.
थरूर यांच्यावर देशभरात विविध प्रकरणांत नऊ एफआयआर दाखल आहेत.