Lok Sabha Election 2024 : सोनिया गांधी, राहुल गांधी अन्...; 'या' नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा PHOTOS

Akshay Sabale

58 जागांवर मतदान -

लोकसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. आठ राज्यातील 58 जागांवर मतदान होत आहे. जम्मू-काश्मीरमधील एका जागेवर पुन्हा मतदान होत आहे.

priyanka gandhi rahul gandhi | sarkarnama

सोनिया गांधी अन् राहुल गांधी -

काँग्रेसच्या नेत्या, सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीतील एका मतदान केंद्रावर मतदान केलं आहे.

priyanka gandhi rahul gandhi | sarkarnama

आप विरुद्ध भाजप -

पहिल्यांदाच गांधी कुटुंबानं काँग्रेसच्या 'पंजा'ला मतदान केल आहे. कारण, गांधी कुटुंब राहते, तिथे काँग्रेसचा उमेदवार नाही. नवी दिल्लीत 'आप' विरुद्ध भाजप लढत होत आहे.

priyanka gandhi rahul gandhi | sarkarnama

प्रियंका गांधींचे मतदान -

काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी दिल्लीत अटल आदर्श विद्यालयात, लोधी इस्टेट येथील मतदान केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावला आहे.

priyanka gandhi rahul gandhi | sarkarnama

महागाई अन् बेरोजगारी समस्या -

'इंडिया' आघाडी जिंकणार. महागाई आणि बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. संविधान आणि लोकशाहीसाठी आम्ही मतदान करत आहोत, असं प्रियंका गांधी यांनी मतदानानंतर सांगितलं.

priyanka gandhi rahul gandhi | sarkarnama

एस. जयशंकर यांचं मतदान -

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अटल आदर्श विद्यालयात मतदान केलं आहे. मतदान केंद्रावर पहिले मत टाकल्यानं त्यांना प्रमाणपत्रही देण्यात आलं.

s jaishankar | sarkarnama

नवीन पटनायक यांचं मतदान -

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भुवनेश्वर एरोड्रम यूपी येथील शाळेत मतदान केलं आहे. यानंतर त्यांनी सेल्फी पॉइंट येथे फोटोही काढला आहे.

naveen patnaik | sarkarnama

NEXT : महाराष्ट्रातील 20 जागांसह 258 ठिकाणी मतदानाची टक्केवारी घटली, पाहा आकडेवारी

lok sabha voting | sarkarnama