Rajanand More
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये दाखल झाली.
आग्रामध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी यात्रेत सहभाग घेतला.
ये आग्रा हे जनाब, जो दिलों को मिला देता है!, असे म्हणत अखिलेश यांनी दोन्ही पक्ष एकजुटीने काम करणार असल्याचे संकेत दिले.
लोकसभेसाठी सपा आणि काँग्रेसची आघाडी. काँग्रेसच्या वाट्याला 80 पैकी 17 जागा.
सात वर्षांपुर्वी विधानसभा निवडणुकीतही दोन्ही पक्षांची आघाडी होती. ‘यूपी के दो लडके’ अशी साद मतदारांना घालण्यात आली होती.
निवडणुकीत जोडी चालली नाही. भाजपला तब्बल 325 तर आघाडीला 54 जागा मिळाल्या.
विधानसभेतील दारूण पराभवानंतर अखिलेश यांनी काँग्रेसमुळेच पराभव झाल्याचा दावा केला होता.
लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा अखिलेश आणि राहुल यांची जोडी एकत्र आली आहे.
मोदी लाटेत ही जोडी आपला करिष्मा दाखवणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.