Akshay Sabale
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाकड आणि भेकड पक्षाचे नेते आहेत, असा हल्लाबोल शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची स्थापना केली, तेव्हा नरेंद्र मोदी हे हिमालयात असतील, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
चंद्रपुरातील मोदींचं भाषण हे भाकड जनता पक्षाच्या नेत्याचं होतं. कारण, आम्ही यापुढे दिलेले उत्तर पंतप्रधानांना दिलं म्हणून समजू नये, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
भाजपत ताकद नाही म्हणून भेकड म्हटलं. आणि यांच्याकडे नेते निर्माण झाले नाहीत म्हणून भाकड म्हणालो. विचारांचा आदर्श हे देऊ शकलेले नाहीत.
संपूर्ण देशातील 'भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा,' हे भाजपचं धोरण आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी वाभाडे काढले आहेत.
महाराष्ट्राबाहेरील माणसं येऊन नकली आणि खरी शिवसेना सांगतात, हा कहर झाला आहे. भाजप हा खंडणीखोर पक्ष आहे. 'चंदा दो आणि धंदा लो,' हे भाजपचं काम आहे.
खंडणीखोर पक्षाचे नेते शिवसेनेला नकली ठरवून गेले. त्याच पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह 2019 मध्ये बाळासाहेबांच्या फोटोसमोर लोटांगण घालायला 'मातोश्री'त आले होते.
खंडणीखोर पक्षाच्या नेत्यानं, असं शिवसेनेला नकली म्हणून हिणवणं योग्य नाही. शिवसेना गुजरातला पळवायची होती, ती मी पळवू दिली नाही, असंही ठाकरेंनी म्हटलं.
R