Lok Sabha Election 2024 Voting : तिसऱ्या टप्प्यातील मतदान केंद्रावरील ठळक घडामोडी; पाहा एका क्लिकवर...

Chetan Zadpe

माळशिरसमध्ये बनावट नोटा?

माळशिरसमध्ये सत्ताधारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बनावट नोटांचा वाटप केल्याचा आरोप, महाविकास आघाडीचे बडे नेते उत्तम जानकर यांचा आरोप.

व्हीव्हीपॅटमधील मशिनमध्ये बिघाड -

दक्षिण सोलापूर येथील गंगेवाडी या मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशिनमध्ये बिघाड झाला होता. यामुळे 15 ते 20 मिनिटे मतदानाला ब्रेक लागले होते.

नियमांचा बट्ट्याबोळ, व्हिडीओ व्हायरल -

आयोगाच्या या नियमाला सोशल माध्यमावरील नेटकऱ्यांनी धाब्यावर बसवत मतदान करतानाचे व्हिडीओ सर्सास व्हायरल केले आहेत.

कार्यकर्ते भिडले -

हातकणंगले मतदारसंघात कार्यकर्ते भिडले, दोन गटात हाणामारी, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मतदान सुरळीत !

मतदानावर बहिष्कार -

रायगड लोकसभा मतदारसंघातील पेण तालुक्याचे बाळगंगा प्रकल्पग्रस्त लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या भूमिकेवर कायम आहेत. पुनर्वसन झाल्याशिवाय मतदान नाही अशी भूमिका

पैसे वाटल्याचा आरोप -

मतदान करण्यासाठी पैसे वाटल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर केला आहे. याबाबतचे काही व्हिडिओही त्यांनी ट्विट केले आहेत.

मतदानादिवशी खून -

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील पाटसांगवी (ता. भूम) या गावात मतदानाच्या दिवशी दुपारी 12 च्या सुमारास एकाचा भोसकून खून करण्यात आला. या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

NEXT : 'या' नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क...