Who Is Ajay Rai : मोदींविरोधात वाराणसीतून तिसऱ्यांदा मैदानात उतरलेले अजय राय कोण आहेत?

Akshay Sabale

काँग्रेसची चौथी यादी जाहीर -

काँग्रेसनं शनिवारी आपली चौथी यादी जाहीर केली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून अजय राय यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ajay rai | sarkarnama

राय तिसऱ्यांदा मैदानात -

2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अजय राय आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अटीतटीची लढाई झाली होती. आता तिसऱ्यांदा मोदींविरोधात राय मैदानात उतरले आहेत.

ajay rai | sarkarnama

ABVP तून राजकीय सुरुवात -

काँग्रेस नेते अजय राय यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1969 मध्ये वाराणसीत झाला होता. राय यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून केली.

ajay rai | sarkarnama

पहिल्यांदा विधानसभेत विजय -

1996 मध्ये राय यांनी भाजपच्या तिकिटावर कोलासला मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत 9 वेळा आमदार असलेले उदल यांचा 484 मतांनी पराभव केला.

ajay rai | sarkarnama

राय यांचा पराभव -

2009 लोकसभेला भाजपनं तिकीट न दिल्यानं राय यांनी पक्षाला राम राम ठोकला. यानंतर ते 'सपा'त सामील झाले. 'सपा'नं मुरली मनोहर जोशींविरोधात राय यांना उमेदवारी दिली. पण, राय यांचा पराभव झाला.

ajay rai | sarkarnama

विधानसभा निवडणुकीत पराभव -

2012 मध्ये राय यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते 2012 मध्ये विधानसभा निवडणुकीत निवडून आलं. पण, 2017 विधानसभा निवडणुकीत राय यांचा अवधेश सिंह यांनी 40 हजार मतांनी पराभव केला.

ajay rai | sarkarnama

मोदींनी केला पराभव -

2014 च्या लोकसभा निवडणुकीत राय आणि नरेंद्र मोदी यांच्यात पहिल्यांदा लढाई झाली. पण, मोदींनी राय यांचा पाच लाखांहून अधिक मतांनी पराभव केला.

ajay rai | sarkarnama

दुसऱ्यांदा मोदींनी केला पराभव -

2019 च्या निवडणुकीतही मोदींनी राय यांचा पाच लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता.

ajay rai | sarkarnama

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष -

ऑगस्ट 2023 मध्ये काँग्रेसनं बृजलाल खाबरी यांना हटवून राय यांना उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष बनवलं. त्यातच आता राय यांनी तिसऱ्यांना मोदींविरोधात शड्डू ठोकला आहे.

R

ajay rai | sarkarnama

NEXT : माजी हवाई दल प्रमुखांचा भाजपत प्रवेश, 'या' मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता

rks badauria join bjp | sarkarnama
क्लिक करा...