Naresh Mhaske News : मुख्यमंत्र्यांचे शिलेदार म्हणून ओळख असलेले म्हस्के कोण आहेत?

Akshay Sabale

म्हस्केंना उमेदवारी -

ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथून नरेश म्हस्के यांना शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

naresh mhaske | sarkarnama

मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय -

नरेश म्हस्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. म्हस्के हे अनेक वर्षापासून ठाण्यात नगरसेवक आणि महापौरही होते.

naresh mhaske | sarkarnama

राजकीय प्रवास -

नरेश म्हस्के यांच्या राजकीस प्रवासाची सुरुवात भारतीय विद्यार्थी सेनेपासून झाली. यानंतर ते नगरसेवक, जिल्हाप्रमुख, सभागृह नेते आणि महापौर असा त्यांचा प्रवास आहे.

naresh mhaske | sarkarnama

महापौर -

आमदारकीसाठी इच्छुक असताना म्हस्केंना तिकीट न मिळाल्याने त्यांना ठाणे मनपाचे महापौर करण्यात आले अशी चर्चा होती.

naresh mhaske | sarkarnama

काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल -

म्हस्केंच्या आक्रमक शैलीमुळे त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला होता.

naresh mhaske | sarkarnama

चारवेळा नगरसेवक -

ठाणे मनपामध्ये नरेश म्हस्के हे चार टर्म नगरसेवक आहेत. यातील दोन वेळेस ते निवडून आले आहेत तर दोन वेळा ते स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात बसले.

naresh mhaske | sarkarnama

नगरसेवक म्हणून निवडून आले -

2012 मध्ये नरेश म्हस्के यांची ठाणे मनपाच्या स्विकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. यानंतर ते 2017 ला नगरसेवक म्हणून निवडून आले.

naresh mhaske | sarkarnama

2019 ला महापौर बनले -

2017 ला त्यांच्यावर सभागृह नेता म्हणून जबाबदारी देण्यात आली. तर 2019 मध्ये ते ठाण्याचे महापौर बनले.

naresh mhaske | sarkarnama

शिवसेना विरुद्ध शिवसेना -

आता म्हस्केंना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. त्यांची लढाई ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांच्याशी होणार आहे. त्यामुळे ठाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत दिसेल.

naresh mhaske | sarkarnama

NEXT : 4 कोटींचं कर्ज अन् 50 तोळे सोनं; रावसाहेब दानवेंची एकूण संपत्ती किती?

Raosaheb danve | sarkarnama