Lok Sabha Election Fifth Phase Voting : राजनाथ सिंह, राहुल गांधी, स्मृती इराणींसह या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!

Rajanand More

राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राहुल गांधी यांचा रायबरेली मतदारसंघही आहे. वायनाडनंतर ही त्यांची दुसरी परीक्षा असेल.

Rahul Gandhi | Sarkarnama

स्मृती इराणी

अमेठी मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा मैदानात. काँग्रेसकडून पहिल्यांदाच गांधी कुटुंबाव्यतिरिक्त अन्य उमेदवार. के. एल. शर्मा यांचे आव्हान.

Smriti Irani | Sarkarnama

राजनाथ सिंह

उत्तर प्रदेशातील लखनौ मतदारसंघातून उमेदवारी. समाजवादी पक्षाकडून रविदास मेहरोत्रा रिंगणात. सिंह यांचा सहज विजय होण्याची शक्यता.

Rajnath Singh | Sarkarnama

पियुष गोयल

उत्तर मुंबई मतदारसंघातून पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात. काँग्रेसने भूषण पाटील यांना दिली उमेदवारी.

Piyush Goel | Sarkarnama

चिराग पासवान

बिहारमधील पारंपरिक हाजीपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात. भाजपसोबत आघाडी असल्याने विजयाचा मार्ग सुकर.

Chirag Paswan | Sarkarnama

डॉ. भारती पवार

दिंडोरी मतदारसंघातून दुसऱ्यांदा भाजपच्या तिकीटावर उमेदवार. कांदा प्रश्नामुळे विरोधकांनी आव्हान उभे केले आहे.

Dr. Bharti Pawar | Sarkarnama

उमर अब्दुल्ला

कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमधील पहिल्यांदाच निवडणूक. अब्दुल्ला यांची बारामूला मतदारसंघात प्रतिष्ठा पणाला.

Omar Abdullah | Sarkarnama

डॉ. श्रीकांत शिंदे

कल्याण मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा रिंगणात असले तरी शिवसेनेतील फुटीनंतर पहिलीच निवडणूक. वडील मुख्यमंत्री असल्याने निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

Dr. Shrikant Shinde | Sarkarnama

रोहिणी आचार्य

बिहारमधील सारण मतदारसंघातून पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात. भाजपच्या राजीव प्रताप रुडी यांचे आव्हान. लालू प्रसाद यादव यांच्या कन्या असल्याने हायप्रोफाईल लढत.

Rohini Acharya | Sarkarnama

NEXT : राज्यात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात या हाय होल्टेज लढती

येथे क्लिक करा.