Sachin Fulpagare
लोकसभा निवडणुकीपूर्वी एक ताजा ओपिनियन पोल समोर आला आहे. यात पुन्हा भाजप प्रणित एनडीएची सत्ता येणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत 'इंडिया' आघाडी उभी केली आहे. पण ओपिनियन पोलच्या अंदाजात आघाडीला यश मिळताना दिसत नाहीये.
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुलाखत देत असताना अभिनेते नाना पाटेकर यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे ते म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय होईल. भाजपला 350 ते 375 जागा मिळतील. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असे नाना पाटेकर म्हणाले.
केंद्रातील सरकारचे काम शानदार आहे. निवडणुकीत नरेंद्र मोदींना कुठलाही पर्याय दिसत नाही. भाजपला बहुमत मिळेल आणि मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असे नाना पाटेकर बोलले.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. यात भाजपला मोठे यश मिळाले. आता लोकसभा निडणुकीत भाजप प्रचंड बहुमताने विजयी होईल, असे नाना पाटेकर म्हणाले.
काही दिवसांपूर्वी शूटिंगवेळी एक चाहता नाना पाटेकरांकडे सेल्फी घेण्यासाठी गेला. त्याला सेल्फ न देता त्यांनी त्याच्या कानाखाली लगावली होती. नंतर त्यांनी एका व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण दिले होते.