सरकारनामा ब्यूरो
2024 च्या लोकसभा निवडणुकीत NRI भारतीयांनी किती टक्के मतदान केले आहे, याची आकडेवारी समोर आली आहे.
जे अनिवासी भारतीय आहेत, त्यांना भारतीय पत्त्यावरील मतदारसंघातील मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे लागते. यामुळेच बरेच लोक मतदानासाठी येऊ शकले नाहीत.
लोकसभेच्या निवडणूकीसाठी 1,19,374 इतक्या NRI मतदारांनी नोंदणी केली होती. परंतु, त्यापैकी फक्त 2,958 मतदारांनी मतदान केले.
निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार, 2019 च्या निवडणुकीत मतदारांचा 25.6% इतका आकडा होता, मात्र, 2024 ला हा आकडा केवळ 2.5% इतका झाला आहे.
भारतातील दक्षिणेकडील केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू आणि कर्नाटक या पाच राज्यांत सर्वाधिक NRI मतदारांची नोंदणी झाली असून यामध्ये 90 टक्के NRI मतदारांचा समावेश आहे.
आकडेवारीनुसार, तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये एकाही NRI भारतीयांने मतदान केले नाही. केरळमध्ये 89,839 मतदार नोंदणी केलेले होते, परंतु 2.97% लोकांनी मतदान केले. जे 2019 च्या तुलनेत 29.13% खूपच कमी आहे.
उत्तर प्रदेशात 859 नोंदणी केलेले मतदार होते. तर पंजाबमध्ये यावेळी 1,613 मतदारांपैकी केवळ 13 मतदारांनी मतदान केले. राजस्थानमध्ये एकाही नवीन NRI मतदारांची नोंदणी झाली नाही.
आंध्र प्रदेशमध्ये 7,927 नोंदणी केलेल्या मतदारांपैकी 195 मतदारांनी मतदान केले. तर तेलंगणात 3,470 मतदारांपैकी 3 मतदारांनी मतदान केले. 2019 मध्ये एकही मतदान झाले नव्हते.
मतदार नोंदणीसाठी NRI भारतीयांनी नॅशनल व्होटर्स सर्व्हिसेस पोर्टलवर फॉर्म 6A आवश्यक पुराव्यांसह ऑनलाइन भरणे आवश्यक आहे. त्यानंतर मतदार म्हणून त्यांचे नाव मतदारयादीत येते.