Rajanand More
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यामध्ये 57 जागांवर मतदान होणार आहे. त्यापैकी वाराणसी हा मतदारसंघात सर्वात हायप्रोफाईल असून पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे उमेदवार आहेत.
हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघात भाजपच्या उमेदवार, अभिनेत्री कंगना रनौत आणि काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांच्यात लढत होत आहे.
काँग्रेसचे उमेदवार खासदार मनिष तिवारी चंदीगढमधील उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने संजय टंडन यांना उमेदवारी दिली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी हे डायमंड हार्बर मतदारसंघातून टीएमसीचे उमेदवार आहेत.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती यांची पहिलीच निवडणूक. पाटलीपुत्र मतदारसंघात राजदच्या उमेदवार.
पंजाबमधील पटियालामधून भाजपकडून काँग्रेसच्या खासदार परनीत कौर रिंगणात. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत.
गोरखपुर मतदारसंघातून भाजपने प्रसिध्द अभिनेते रवी किशन यांना पुन्हा संधी दिली आहे. हा मतदारसंघ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड.
झारखंडचे मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या सून. दुमका मतदारसंघात भाजपच्या उमेदवार असून 'झामुमो'कडून विरोधात नलीन सोरेन यांना उमेदवारी.