Rajanand More
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह राजगढ मतदारसंघात नशीब आजमावत आहेत.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत. मागील निवडणुकीत झाला होता पराभव.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व भाजप नेते शिवराज सिंह चौहान अनेक वर्षांनंतर विदिशा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत.
महाराष्ट्रातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे अनेक वर्षांनंतर निवढणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव सपाचा गड असलेल्या मैनपुरी मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत.
मागील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले पुन्हा सातारा मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.
गुजरातचे भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना पुन्हा राजकोटमधून संधी दिली आहे.