Mangesh Mahale
पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी लोकसभेसाठी वाराणसीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
मोदी यांच्या नावे तमिळ, बंगाली, पंजाब, ओडिशा, बांगला, कन्नड, तेलुगू, मराठी, मल्याळम भाषेत एक्सवर अकाउंट तयार केली आहेत.
मोदींचे कार्यक्रम, सभा, रॅली याविषयीची माहिती प्रादेशिक भाषेतील एक्स हँडलवर अपलोड करण्यात येत आहे.
प्रत्येक राज्याशी स्थानिक भाषेत संवाद साधून येथील जनतेशी भावनिक नाते दृढ करण्याचा प्रयत्न मोदी करीत आहेत.
नरेंद्र मोदी तमिळ, नरेंद्र मोदी बांगला', 'नरेंद्र मोदी ओडिया', 'नरेंद्र मोदी पंजाबी', 'नरेंद्र मोदी कन्नड', 'नरेंद्र मोदी तेलुगू', 'नरेंद्र मोदी मराठी' आणि 'नरेंद्र मोदी मल्याळम' अशी त्यांची अकाउंंट आहेत.
एक्स हँडलच्या माध्यमातून मोदींच्या भाषणांचे या आठ भाषांमध्ये भाषांतर करण्यात येते. त्यानंतर ते व्हायरल केले जाते.
असा प्रयोग करणारा भाजप हा जगातील पहिला पक्ष असल्याचा दावा भाजप आयटी सेलचे अमित मालवीय यांनी केला आहे.
R