Chetan Zadpe
आई ही शब्दांपलीकडची भावना आहे. आपुलकी, त्याग, संयम आणि शक्तीची प्रतिती आहे.आज मातृदिनाच्या शुभ मुहूर्तावर मी सर्व मातृशक्तीला वंदन करतो, असे राहुल गांधी म्हणाले.
आई आपली प्रथम गुरु, तिच्यापासुनी आपले अस्तित्व सुरु, आई तू इअसे सदैव स्मरणी, असे एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त केली.
आज जागतिक मातृदिन, जगातील प्रत्येक माऊलीच्या सन्मानाचा दिवस. तमाम मातांच्या त्याग, समर्पण आणि वात्सल्याला सलाम, अशा शुभेच्छा रोहित पवारांनी दिल्या.
भावडांच्या व पुतण्याच्या निधनानंतर कोणत्याही गोष्टीची कमतरता न पडू देता आईने घराला सावरण्याचे काम केले. आजही वयाच्या शंभरीपर्यंत आलेली आई त्याच अधिकारवाणीने सर्व गोष्टी मला सांगत असते.
मदर्स डे निमित्त सुप्रिया सुळे हा विशेष फोटो शेअर केला आहे.
निरपेक्ष प्रेमाचे प्रतीक असलेल्या मातृदिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा, असे म्हणत अदिती यांनी आपल्या कुटुंबियांचे फोटो शेअर केले आहेत.
आई असतो एक धागा,वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा - रणजीतसिंह मोहिते पाटील
माझ्या जीवनाचा सारांश सांगायचे झाल्यास आईच्या नावाने सुरू आणि आईच्या नावानेच संपन्न असे सांगता येईल, अशी भावना ओमराजेंनी व्यक्त केली.