Roshan More
तमिळानाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या सर्वात लहान कन्या कनिमाळी आहेत. सध्या डीएमकेचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या त्या सावत्र बहिण आहेत.
कनिमाळी या द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) पक्षाच्या संसदीय पक्षनेत्या असणार आहेत. संसदेतील डीएमकेच्या लीडर म्हणून पक्षाकडून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
कनिमाळी या राजकारणात येण्यापूर्वी पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होत्या. 'द हिंदू'मध्ये उपसंपादक तसेच , कुंगुमम (तमिळ साप्ताहिक) मध्ये त्यांनी प्रभारी संपादक म्हणून काम केले आहे.
कनिमाळी या 2007 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेच्या खासदार झाल्या. राज्यसभेत डीएमकेच्या आवाज म्हणून त्या ओळखल्या जात होत्या.
कनिमाळी यांनी अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. तसेच त्यांनी काही पुस्तके देखील प्रसिद्ध झाली आहेत.
कनिमाळी यांच्या साहित्यकृतींचे इंग्रजी, मल्याळम, तेलुगू आणि कन्नडमध्ये अनुवाद झाले आहेत.
2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात आरोपावरून कनिमोळी या तिहार तुरूंगात होत्या.
महिलांच्या कल्याणासाठी विविध योजना तसेच कार्यक्रम आखण्यात कनिमाळी यांचा पुढाकार असतो.