Akshay Sabale
2014 नंतर प्रथमच देशाला काँग्रेस नेते, राहुल गांधी यांच्या रूपानं विरोधी पक्षनेता मिळणार आहे. 2009 ते 2014 पर्यंत दिवंगत सुषमा स्वराज लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या होत्या.
2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कुठल्याही पक्षाचे एकहाती 54 खासदार निवडून आले नव्हते. पण, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे 99 खासदार निवडून आले आहेत.
भारतीय लोकशाहीत काही पदे खूप शक्तीशाली आहेत. त्यात विरोधी पक्षनेते पदाचा देखील समावेश आहे. त्यामुळेच राहुल गांधी विरोधी पक्षनेते बनले आहेत.
राहुल गांधींना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळणार आहे. त्यानुसारच त्यांना वेतन आणि अन्य सुविधा मिळणार आहेत.
विरोधी पक्षनेत्याला केंद्रीय मंत्र्या समानच वेतन मिळते. विरोधी पक्षनेत्याला महिन्याला 3.30 लाख रूपये वेतन मिळते.
कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाचे घरही विरोधी पक्षनेत्याला मिळते. त्यासह चालकासह कार आणि कार्यालयीन कामकाज सांभाळण्यासाठी 14 जणांचा स्टाफही मिळतो.