Roshan More
1952 साली पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश वासुदेव मावळंकर हे होते.
गणेश मावळंकर यांचा जन्म बडोद्याला मराठी कुटुंबात 7 नोव्हेंबर 1888 मध्ये झाला
गणेश मावळंकर यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरजवळचे मावळंगे हे आहे.
गणेश मावळंकर यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर येथे झाले. तर उच्च शिक्षण अहमदाबाद येथे झाले.
मावळंकर हे मराठी असले तरी त्यांचे वास्तव हे गुजरातमध्ये होते.
1952 मध्ये पहिल्या लोकसभा निवडणुकीत मावळंकर हे अहमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेले .
गणेश मावळंकर हे राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी वकिली करत होते.