Bhartruhari Mahtab : माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र, खासदारकीची सातवी टर्म..! कोण आहेत लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब?

Rajanand More

भर्तृहरी महताब

मोदी सरकारने अठराव्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे खासदार भर्तृहरी महताब यांची नियुक्ती केली आहे.

Bhartruhari Mahtab | Sarkarnama

खासदारकीची सातवी टर्म

ओडिशातील कटक मतदारसंघाचे खासदार असून ही त्यांची सातवी टर्म आहे. बिजू जनता दलाचे ज्येष्ठ नेते म्हणून लोकप्रिय होते.

Bhartruhari Mahtab | Sarkarnama

भाजपमध्ये एन्ट्री

लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश. मागील सहा निवडणुका बिजू जनता दलाच्या तिकीटावर लढवल्या होत्या. 2024 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार.

Bhartruhari Mahtab, JP Nadda | Sarkarnama

पोलिस उपनिरीक्षकाचा छळ

एका पोलिस उपनिरीक्षकाचा छळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर बीजेडीमध्ये असताना विशेष न्यायालयाकडून आरोप निश्चित. त्यानंतर पक्ष सोडला.

Bhartruhari Mahtab | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांचे पुत्र

ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्ण महताब यांचे ते पुत्र आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणात त्यांचा सुरूवातीपासूनच दबदबा.

Bhartruhari Mahtab | Sarkarnama

पक्षात मतभेद

बीजेडीमध्ये असताना पक्षाच्या काही धोरणांवर उघडपणे टीका. पक्षनेतृत्वाच्या भूमिकेवरूनही नाराजी व्यक्त केली होती.

Bhartruhari Mahtab | Sarkarnama

वृत्तपत्राचे मालक

ओडिया भाषेतील वृत्तपत्राचे मालक व संपादक आहे. या वृत्तपत्रातून आपल्याच पक्षाच्या सरकारमधील मंत्र्यांविरोधात सातत्याने बातम्या प्रसिध्द होत होत्या.

Bhartruhari Mahtab | Sarkarnama

तालिका अध्यक्ष

लोकसभेच्या तालिका अध्यक्षांच्या पॅनेलमध्ये यापुर्वी महताब यांचा समावेश होता. तसेच सरकारच्या विविध समित्यांमध्येही त्यांचा समावेश होता.

Bhartruhari Mahtab | Sarkarnama

खासदारांना देणार शपथ

अठराव्या लोकसभेत निवडून आलेल्या खासदारांना शपथ देतील. तसेच नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूकही त्यांच्याच अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

PM Narendra Modi, Bhartruhari Mahtab | Sarkarnama

NEXT : नो-कोचिंग, नो-सोशल मीडिया; UPSC मध्ये यश...

येथे क्लिक करा