Sunil Balasaheb Dhumal
बीड लोकसभेतून भाजपने पंकजा मुंडेंना, तर शरद पवार गटाने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे.
सोनवणे यांच्या उमेदवारीने बीड लोकसभेच्या निडणुकीत चुरस वाढली आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सोनवणेंनी अजित पवारांची साथ दिली होती.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
बजरंग सोनवणे यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.
ते बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती होते.
ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदापासून त्यांनी राजकीय सुरुवात केलेली आहे.
गत लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणेंनी भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना टक्कर दिली होती.
R