Roshan More
पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात आले तेव्हा प्रत्येक सभेला विशेष फेटा त्यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
निवडणुकीपूर्वी मोदी सोलापूरला आले होते. तेव्हा त्यांनी परिधान केलेल्या भगव्या फेट्याची आणि त्यावर असलेल्या ब्रोच आकर्षण ठरले होते.
नगरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींनी सभा घेतली तेव्हा गुलाबी फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला.
मराठा शैर्याची साक्ष देणारी मोतांचा तुरा असणारी दिग्विजय योद्धा पगडी मोदींना देऊन सन्मानित करण्यात आले होते.
बीड लोकसभा मतदारसंघातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना वारकरी पगडी प्रदान केली होती.
माढ्यातील सभेत मोदींना पिवळा फेटा बांधून काठी अन् घोंगडं देऊन सत्कार करण्यात आला.
कोल्हापूरच्या सभेत कोल्हापुरी फेटा बांधून सन्मानित करण्यात आले.
सातारा मतदारसंघातील कराडमध्ये पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या सभेत भगव्या आणि पोपटी रंगाचा फेटा घातला होता. त्यावर कमळ चिन्हदेखील होते.