सरकारनामा ब्यूरो
राजकीय पक्ष आणि उमेदवारांना निवडणूक आयोगाने लागू केलेले काही नियम पाळावेच लागतात. या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यावर कारवाई केली जाते.
निवडणुकी जाहीर झाल्यानंतर लागू करण्यात येणाऱ्या सर्व नियम आणि निर्देशांना आचारसंहिता असे म्हटले जाते.
आचारसंहिता लागू झाल्यापासून कोणतेही सरकारी धोरणात्मक निर्णय घेता येत नाही.
कोणतीही नवीन शासनाची योजना किंवा त्यावरील अंमलबजावणी करण्यावर बंदी असते.
कोणत्याही पक्षाच्या प्रचारात सरकारी वाहन किंवा सरकारी कर्मचाऱ्यांचा वापर करण्यास सक्त मनाई असणार आहे.
प्रचारासाठी कोणत्याही धार्मिक स्थळांचा वापर करण्यावर बंदी असणार आहे.
राजकीय सभा आणि रॅली घ्यायची असल्यास प्रथमत: पोलिसांची परवानगी लागणार आहे.
कोणत्याही आवारात परवानगीशिवाय पोस्टर्स किंवा होर्डींग्ज लावता येणार नाही.