Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात 2019 च्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीत घट!

Deepak Kulkarni

तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभरात मंगळवारी तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले.

Loksabha Election 2024

94 लोकसभा मतदारसंघात मतदान

तिसऱ्या टप्प्यात 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 94 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले.

Loksabha Election 2024

61.44 टक्के मतदान

राज्यातील बारामती, सातारा, सांगली, धाराशिव, माढा, सोलापूर यांसह एकूण 11 लोकसभा मतदारसंघात 61.44 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर येत आहे.

Loksabha Election 2024

सर्वाधिक जास्त आणि कमी...

सर्वाधिक मतदान कोल्हापुरात 70.35 टक्के मतदान झालं असून सर्वाधिक कमी मतदान हे बारामतीमध्ये 56.07 इतकं झालं आहे.

Loksabha Election 2024

मतदानाची टक्केवारी घसरली...

गेल्या 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान कमी झाले आहे, तर दुसरीकडे 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत ही टक्केवारी कमी आहे.

Loksabha Election 2024

घसरलेली टक्केवारी कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार ?

या निवडणुकीत कमी झालेली मतांची टक्केवारी महाविकास आघाडी की महायुती कोणाच्या पथ्यावर पडणार याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Loksabha Election 2024

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात लोकसभेच्या 11 लोकसभेच्या मतदारसंघात उदयनराजे, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, नारायण राणे, प्रणिती शिंदेसारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला आहे.

Loksabha Election 2024

4 जूनपर्यंत प्रतीक्षा...

या निवडणुकीत महायुतीचा फायदा होणार की महाविकास आघाडीचा हे समजून येण्यासाठी सर्वांना 4 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Loksabha Election 2024

NEXT : लोकसभेच्या रणधुमाळीत जयदत्त क्षीरसागर 35 वर्षांत पहिल्यांदाच 'Wait & Watch'च्या भूमिकेत!