Ganesh Thombare
शांतीगिरी महाराज हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.
शांतीगिरीजी महाराज हे वेरूळ मठाचे मठाधीपती आहेत.
शांतीगिरी महाराजांनी अचानक नाशिकच्या राजकारणात एन्ट्री केली आहे.
‘आतापर्यंत लोकांसाठी अन् आता बाबांसाठी’ अशी घोषणा त्यांच्या भक्तांनी केली.
छत्रपती संभाजीनगर व नाशिकमध्ये महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे.
शांतीगिरी महाराजांनी 2009 ला चंद्रकांत खैरेंच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
खैरेंच्या विरोधात लढवलेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.
2009 नंतर महाराज सक्रीय राजकारणापासून काहीसे दूर राहिले होते.
महाराज नाशिक लोकसभा लढवतील, असे महाराजांच्या भक्तांनी जाहीर केले.