Rajanand More
राज्यसभेतील 56 खासदार एप्रिलमध्ये निवृत्त होणार. त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा सदस्यांचा समावेश.
रिक्त होणाऱ्या जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर. 27 फेब्रुवारीला होणार मतदान.
राज्यसभा निवडणुकीची प्रकिया 8 फेब्रुवारीपासून. 15 फेब्रुवारीला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख.
राणे हे भाजपचे खासदार असून सध्या केंद्रीय मंत्रीही आहेत. महाराष्ट्रातील महत्वाचे नेते असल्याने त्यांना पुन्हा राज्यसभेवर संधी मिळण्याची शक्यता.
जावडेकर हे 2008, 2014, 2018 मध्ये राज्यसभेचे खासदार. मोदी सरकारमध्ये महत्वाची खातीही सांभाळली. चौथ्यांदा संधी मिळण्याची शक्यता कमी.
मुरलीधरन हे मुळचे केरळचे असून महाराष्ट्रातून राज्यसभेवर. सध्या केंद्रात परराष्ट्र व संसदीय कार्य राज्यमंत्री.
ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर हे काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेत. पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता कमी.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर राज्यसभेत. पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांसोबत गेल्या. या गटाकडे राज्यसभेसाठी आमदारांचे आवश्यक संख्याबळ नाही.
शिवसेनेचे खासदार. पक्षात फूट पडल्यानंतर उध्दव ठाकरेंसोबत राहिले. तिसऱ्यांदा राज्यसभेत जाण्याची शक्यता नाही.