Deepak Kulkarni
हातकणंगलेत शिवसेनेचे धैर्यशील माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यात लढत होत आहे.
शेट्टी हे अखेर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार हे आता स्पष्ट झाले आहे.
राजू शेट्टी यांनी सोमवारी दसरा चौकातून बैलगाडीने जात उमेदवारी अर्ज दाखल केला.
या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. एकप्रकारे जोरदार विराट शक्तिप्रदर्शनच त्यांनी केले.
जाहीर सभेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह जयंत पाटील आणि सतेज पाटलांवर टीकेची झोड उठवली.
सगळे कारखानदार हातकणंगलेमध्ये काड्या करण्यात सामील असल्याचा हल्लाबोलही शेट्टी यांनी केला.
ईडीला मी हिंगलत नाही, मला एकदा नोटीस पाठवावी, असे आव्हानही त्यांनी या वेळी दिले. तसेच सध्या ईडी कार्यालयावरच मोर्चा काढावा अशी परिस्थिती असल्याचेही शेट्टी या वेळी म्हणाले.
स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने यापुढचा लढा विद्यार्थ्यांसाठी आणि बेरोजगारासाठी उभारणार असल्याचेही राजू शेट्टी या वेळी म्हणाले.
R