Rashmi Mane
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संकल्प पत्राचे अनावरण करण्यात आले.
भाजप सरकार आल्यास पुढील 5 वर्षे काय काम करणार आणि देशातील नागरिकांना 5 वर्षे काय मोफत मिळणार असल्याचे त्यांनी या जाहीरनाम्यामध्ये सांगितले आहे.
तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब अशा चार 'जाती' लक्षात घेऊन जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.
मोदींनी मोफत वीज योजना आणि मोफत अन्न योजनेअंतर्गत अनेक मोठ्या घोषणाही केल्या. स्वानिधी योजना (पीएम स्वानिधी योजना), उज्ज्वला योजना, आयुष्मान योजना आणि इतर योजनांची व्याप्ती वाढविण्याबाबतही घोषणा केली.
येत्या पाच वर्षांसाठी गरीब कुटुंबांना मोफत रेशन दिले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान म्हणाले की, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना 5 लाख रुपयांचे मोफत उपचार केले जातात. आगामी काळात त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे.
पंतप्रधान म्हणाले की, उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन दिले जात आहेत आणि गॅस सुविधा प्रत्येक घरापर्यंत पोहोचली जाणार आहे.
R