Deepak Kulkarni
भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी अभिनेत्री हेमा मालिनी यांना मथुरा मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे.
त्या मथुरा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत.
अभिनेत्री हेमा मालिनी मथुरा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर तिसऱ्यांदा निवडणूक लढविणार आहेत.
2014, 2019 अशा दोनवेळेला लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. यंदा त्यांना हॅटट्रिकची संधी आहे.
तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे कारण हेमा मालिनी यांनी सांगितले आहे.
मी कृष्णभक्त असून, मथुरेच्या विकासाबाबत मी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठीच पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचे हेमा मालिनी यांनी स्पष्ट केले आहे.
मथुरा मतदारसंघ माझ्याकडे नसता, तर कदाचित मी निवडणूक लढविली नसती.
मथुरेतील लोकांमध्ये अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याविषयी प्रचंड आकर्षण आहे.
या आकर्षणाचे रूपांतर मतांमध्ये होणार का, तसेच हेमा मालिनी खासदारकीची हॅटट्रिक पूर्ण करणार का हे आगामी काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
R