Hatkanangle Loksabha Election : धैर्यशील मानेंच्या उमेदवारीवर टांगती तलवार; 'या' महिला नेत्याचं नाव चर्चेत

Deepak Kulkarni

सध्या शिवसेनेचे खासदार...

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे धैर्यशील माने हे खासदार आहेत. 

Dhairyasheel Mane | Sarkarnama

पहिल्या उमेदवार यादीत धैर्यशील यांचं नाव

त्यांची उमेदवारी गेल्या अनेक दिवसांपासून वेटिंगवर होती. मात्र शिवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीत धैर्यशील माने यांचं नाव होतं. त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. 

Eknath Shinde | Sarkarnama

उमेदवारीवर आता टांगती तलवार

माने यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार असून त्यांच्या जागी त्यांच्या मातोश्री आणि माजी खासदार निवेदिता माने यांना उमेदवारी देण्याच्या मागणी जोर धरु लागली आहे.

Nivedita Mane | Sarkarnama

राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी संबंधित राजकारणी

निवेदिता संभाजीराव माने या राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी संबंधित राजकारणी आहेत.

Nivedita Mane | Sarkarnama

दोनदा खासदार...

इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून निवेदिता माने या 1999 आणि 2004 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार होत्या.

Nivedita Mane | Sarkarnama

राजू शेट्टींकडून पराभव..

त्यानंतर 2009 साली राजू शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला.

Nivedita Mane | Sarkarnama

धैर्यशील मानेंनी असे काढले पराभवाचे उट्टे...

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी, धैर्यशील माने यांनी त्यांच्या आई, निवेदिता माने यांच्या पराभवाचे उट्टे काढत राजू शेट्टी यांचा पराभव केला होता.

Nivedita Mane | Sarkarnama

जायंट किलर

निवेदिता माने यांचा मुलगा धैर्यशील 2019 मध्ये हातकणंगलेत राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव करत जायंट किलर ठरले होते.

Nivedita Mane | Sarkarnama

तिकीट देण्याच्या हालचाली

धैर्यशील यांची उमेदवारी मागे घेऊन त्या ठिकाणी माजी खासदार निवेदिता माने यांना तिकीट देण्याच्या हालचाली शिंदे गटात सुरू असल्याची माहिती आहे.

Nivedita Mane | Sarkarnama

NEXT : पक्षाने उमेदवारी नाकारल्याने भाजपमध्ये प्रवेश करणारे अनुभव मोहंती आहेत तरी कोण?