Jagdish Patil
सेंट्रल लंडनमध्ये शनिवारी यूकेच्या इतिहासातील सर्वात मोठे उजव्या विचारसरणीचे आंदोलन झाले.
ज्यामध्ये स्थलांतर विरोधी कार्यकर्ते टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.
'युनाईट द किंगडम' मार्च म्हणून काढण्यात आलेल्या या रॅलीत अंदाजे या एक लाखांहून अधिक आंदोलकांनी सहभाग झाले होते.
धक्कादायक बाब म्हणजे या आंदोलनादरम्यान अनेक पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
या आंदोलनाचा मुख्य उद्देश हा ब्रिटनमधील बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध आवाज उठवणे होता.
या वर्षी तब्बल 28 हजारहून जास्त बेकायदेशीर स्थलांतरित ब्रिटनमध्ये आल्याचं सांगितलं जात आहे.
एलॉन मस्क हे व्हिडिओद्वारे या निदर्शनात सामील झाले होते. यावेळी त्यांनी टॉमी रॉबिन्सनशी संवाद साधला आणि ब्रिटनमध्ये संसद बरखास्त करण्याची मागणी केली.
मस्क म्हणाले, 'हिंसा तुमच्याकडे येत आहे. एकतर लढा किंवा मरा' तसंच यावेळी त्यांनी सरकार बरखास्त करण्याची मागणी देखील केली.
दरम्यान, याचवेळी 'स्टँड अप टू रेसिझम' नावाचे एक विरोधी आंदोलन झाले, ज्यामध्ये 5 हजार लोक सहभागी झाले होते.
अनेक निदर्शकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या आणि ते पंतप्रधान केयर स्टारमर यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होते.