Longest Hunger Strikes : महात्मा गांधी, भगतसिंग ते अण्णा हजारे... उपोषणाचे रेकॉर्ड करणारे नेते ६ नेते

Roshan More

इरोम शर्मिला

मणिपूर राज्यातील 'सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा' रद्द करण्याच्या मागणीसाठी यांनी तब्बल 16 वर्ष उपोषण केले. दोन नोव्हेंबर २००० ते 9 ऑगस्ट 2016 या कालावधीत त्यांनी उपोषण केले.

भगतसिंग

क्रांतीकारक भगतसिंग यांनी लाहोरच्या तुरुंगात भारतीय कैद्यांना समान राजकीय हक्क मिळावेत म्हणून तब्बल 116 दिवस उपोषण केले होते.

स्वामी निगमानंद

गंगा नदीच्या पात्रात होणारे बेकायदेशीर खाणकाम आणि दगड फोडण्याचे क्रशर, तसेच प्रदुषणाच्या विरोधात तब्बल 115 दिवस उपोषण केले होते. या उपोषणादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

महात्मा गांधी

अस्पृश्यता निर्मूलनासाठी महात्मा गांधी यांनी 1933 मध्ये 21 दिवस उपोषण केले होते.

मेधा पाटकर

नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणामुळे विस्थापित झालेल्या हजारो आदिवासी आणि ग्रामीण कुटुंबांच्या योग्य पुनर्वसनाची मागणीसाठी त्यांनी 28 मार्च ते 17 एप्रिल 2006 या कालावधीत 20 दिवस उपोषण केले होते.

सोनम वांगचूक

शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ते 28 जूनपासून उपोषण करत होते. त्यांनी 20 दिवस उपोषण केले. उपोषणाच्या 21 व्या दिवशी पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले.

अण्णा हजारे

लोकपालच्या मागणीसाठी अण्णा हजारे 16 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2011 असे 11 दिवस उपोषण केले होते.

NEXT : सोनम वांगचूक यांची राजकीय पार्श्वभूमी माहितेय का? वडील 'या' सरकारमध्ये होते मंत्री...

Sonam Wangchuk | Biography | Sarkarnama
येथे क्लिक करा