Roshan More
सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग हे भारतातील सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले नेते आहेत.
पवन चामलिंग डिसेंबर 1994 पासून मे 2019 पर्यंत सिक्कीमचे मुख्यमंत्री होते. या काळात ते एकूण 24 वर्षे आणि 166 दिवस मुख्यमंत्रीपदावर होते. त्यांचा विक्रम आत्तापर्यंत कोणी मोडू शकले नाही.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे नाव येते.
नवीन पटनायक 5 मार्च 2000 रोजी प्रथमच ओडिशाचे मुख्यमंत्री झाले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यांनी सलग 24 वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषवले.
तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योति बसू आहेत.
ज्योती बसू 23 वर्षे आणि 137 दिवस पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते.
अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री गेगोंग अपांग हे एकूण 19 वर्षे आणि 14 दिवस मुख्यमंत्री पदावर राहिले.
मिझोरमचे माजी मुख्यमंत्री लाल थनहावला हे भारतात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 18 वर्ष 269 दिवस मुख्यमंत्रिपद भूषवले.