सरकारनामा ब्यूरो
लोकसभेचे सर्वाधिक काळ खासदार राहिलेले दिवंगत इंद्रजित गुप्ता हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. 11 वेळा त्यांनी खासदारकीची निवडणूक जिंकली.
व्यवसायाने वकील राहिलेले दिवंगत नेते सोमनाथ चॅटर्जी हे 10 वेळा लोकसभेवर निवडून आले होते. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील लोकसभेचे ते 14 वे अध्यक्षही राहिले.
काँग्रेसचे दिवंगत नेते पी एम सईद हे सलग 10 वेळा लोकसभेवर निवडून आले. लक्षद्वीप मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघातून नऊ वेळा लोकसभेचे सदस्य आहेत.
पत्रकार आणि राजकारणी दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस हे नऊ वेळा लोकसभेवर निवडून आले होते. संरक्षण, रेल्वे आणि उद्योग यासह महत्त्वाची पदे त्यांनी सांभाळली आहेत.
ओडिशाचे माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेस नेते गिरीधर गमंग हे ओडिशातील कोरापुट मतदारसंघातून नऊ वेळा लोकसभेचे सदस्य आहेत.
सिंधिया घराण्याचे वंशज अन् काँग्रेसचे दिवंगत नेते माधवराव शिंदे हे नऊ वेळा खासदार होते.
दिवंगत माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान हे आठ वेळा खासदार झाले आहेत.